कल्याण संकल्प सिद्धी (मालमत्ता खरेदी करणेकरीता कर्ज)


उद्देश व्यवसायाकरिता स्थावर मालमत्ता / जागा जसे कि, दुकान / गाळा / कार्यालय / गोदाम इ. खरेदीकरिता.
पात्रता वैयक्तिक/व्यक्ती, मालकी उद्योग,भागीदारी संस्था, लिमिटेड कंपनी
अतिरिक्त मुद्दे:
१. खरेदी करीत असलेल्या व्यावसायिक माल्मत्तेकरीता ग्राहकाकडे उपलब्ध असलेला गुंतवणूक योग्य पैशाचा
स्त्रोत व खरेदी मूल्य यातील रकमेची कमतरता भरून काढण्यासाठी सदर कर्ज मिळेल. प्रस्तावित व्यवसाय, मालमत्ता खरेदी केल्यावर त्वरित चालू करण्याची आवश्यकता असणार नाही. तसेच सदर मालमत्ता खरेदी ही
कर्जदाराच्या कुटुंबातील अथवा जवळच्या व्यक्तीच्या व्यवसायाकरिता असू शकेल.
२. खरेदी केलेल्या मालमत्तेपासून मिळणाऱ्या प्रस्तावित उत्पन्नाचा स्त्रोत , कर्जाच्या परतफेडीच्या हप्त्याच्या दिड
पटीपेक्षा जास्त असावा.
कर्ज रक्कम किमान: ₹ ५ लाख
कमाल: ₹ ५० लाख (वाढीव मर्यादा गरजेनुसार ₹ १०० लाखांपर्यंत)

मार्जिन खरेदी करण्यात येणाऱ्या मालमत्तेचे बाजार मूल्य व खरेदी करार नाम्यातील किंमत यापैकी कमी असलेलेया रकमेवर किमान मार्जिन @२५% असेल. तारण मालमत्तेचे मुल्यांकन खालील बाबींवर अवलंबून राहील. :
१] मालमत्तेच्या विशिष्ट स्थानामुळे असणारा मुल्यांकनातील फरक.
२] मालमत्ता विकण्यामधील
३] मालमत्तेच्या स्थानानुसार अपेक्षित मुल्यांकन वृद्धि.
(पुरेसे दुय्यम तारण उपलब्ध असल्यास मार्जिन रक्कम २० % पर्यंत कमी करता येईल).
परतफेडीचा कालावधी मुदत कर्ज: कलाम १0 वर्षे
(परत फेडीचा हफ्ता संपूर्ण कर्ज वितरणानंतर एक महिन्यानी अथवा प्रथम आंशिक वितरणाच्या पहिल्या टप्प्यानंतर तीन महिन्यांनी यापैकी आधी येणाऱ्या तारखेनुसार सुरु होईल.)
व्याजदर 10.70 % onwards
तारण खरेदी करण्यात येणाऱ्या मालमत्तेवर साधा / नोंदणीकृत गहाणखताद्वारे बोजा निर्माण करण्यात येईल.
सूचना: १] खरेदी करण्यात येणाऱ्या मालमत्तेचे स्वरूप व्यावसायिक व संपूर्ण मालकीचे असावे.
२] खरेदी करण्यात येणारी मालमत्ता स्वतःचे उपयोगाकरिता अथवा भाडे तत्वावर देण्याकरिता असावी.
३] ग्रामपंचायतीच्या कार्यकक्षेत असणाऱ्या मालमत्तेकरीता ADTP सारख्या सक्षम प्राधिकरणाकडून वैध परवानगी गरजेची आहे.
४] खरेदी करण्यात येणारी मालमत्ता, अकृषीक जागा / जमीन असल्यास खरेदीपासून २ वर्षाचे आत त्यावरील व्यावसायिक इमारतीचे बांधकाम पूर्ण होईल अशी हमी कर्जदाराला लिखित स्वरुपात द्यावी लागेल.
५] कृषीक जमीन /भाडेपट्ट्याअंतर्गत असलेली जागा तारण म्हणून स्वीकारली जाणार नाही.
जामीनदार बँकेस मान्य असलेले २ जमीनदार
Collaterals दुय्यम तारण आवश्यक नाही,
परंतु, key-man Insurance / Term Insurance policy आवश्यकतेनुसार लागेल.
प्रक्रिया शुल्क 0.20% to 0.50 %
Subscription of Bank's Share 2.5% Max Rs.5.00 lacs
Pre-payment Charges

अटी व शर्ती लागू
जादा माहितीसाठी नजीकच्या शाखेशी संपर्क करावा.


Follow Us

        संपर्क करा :    मुख्य कार्यालय     0251-2316641, 0251-2315995 0251-2220700  |   ए.टी.एम. संबंधी     0251-2219008  |   टोल फ्री     18002331919 (सकाळी ९ ते सायंकाळी ६, कामकाजाच्या दिवशी )  |     response@kalyanjanata.in