मालमत्ता कर्ज


उद्देश १. अर्जदाराच्या व्यापार / व्यवसाय / उद्योगाच्या गरजेसाठी.
२. व्यावसायिक/ रहिवासी मालमत्तेची दुरुस्ती / नुतनिकरण / वाढीव बांधकामासाठी.
३. घर बांधणी / निवासी गाळा / घर बांधणी किंवा खरेदी तसेच अकृशिक जमीन खरेदीकरिता (विहित कालावधीमध्ये सदर जागेवर घर बांधण्याची हमी देणारे बंधपत्र देणे आवश्यक आहे )
४. अर्जदाराची बाकी असलेली देणी / कर्जे फेडण्यासाठी.
५. वैद्यकीय उपचार / लग्नकार्य / पर्यटन / ग्राहकोपयोगी वस्तू खरेदी यांसारखे खर्च अथवा वैयक्तिक आर्थिक गरजा भागवणेसाठी
६. बँकेस मान्य असलेल्या इतर कोणत्याही उदेशाकरीता .

सूचना: कर्जाचा उद्देश सट्टेबाजीचा / बेकायदेशीर / रिझर्व्ह बँक अथवा सरकार कडून प्रतिबंधित नसावा.
पात्रता वैयक्तिक/व्यक्ती, मालकी उद्योग,भागीदारी संस्था, लिमिटेड कंपनी .
अन्य बँका अथवा आर्थिक संस्थांकडून कर्ज सुविधा घेणाऱ्या कर्जदारांनासुद्धा या योजने अंतर्गत मल्टीपल बँकिंग व्यवस्थेनुसार कर्ज घेता येईल.
बांधकाम व्यावसायिक / मालमत्तेसंबंधी काम करणारे दलाल आणि शेअर मार्केटचे करणारी व्यक्ती या योजनेंतर्गत कर्जास पात्र नाही.
कर्ज रक्कम ₹ २ लाखांपासून ते ₹ ५० लाखांपर्यंत
[मुदत कर्ज स्वरुपात ₹ १०० लाखांपर्यंत कर्ज रक्कम वाढविता येईल]
मार्जिन [अ] ₹ २५ लाखांपर्यंत मार्जिन @३३.३३% (बँकेस योग्य वाटणाऱ्या प्रकरणात २० % पर्यंत मार्जिन कमी करता येईल.) मार्जिन रक्कमेसाठी तारण मालमत्तेचे बाजार मूल्य आणि खालील बाबी लक्षात घेतल्या जातील.
१. परिसरातील मालमत्तेचे स्थान व त्याचे अनुशांघिक फायदे.
२. परिसरातील मालमत्तांच्या दरातील वृद्धीचा कल.
३. मालमत्ता विकण्यामध्ये असणारी सुलभता.

[ब] ₹ २५ लाखांचे वर- मार्जिन बाजारमूल्याच्या @४० %
परतफेडीचा कालावधी १. मुदत कर्ज : १० वर्षांपर्यंत. कर्ज वितरणापासूनच्या एका महिन्यानंतर समान मासिक हफ्त्यात
२. ओव्हरड्राफ्ट : १२ महिने, वार्षिक पुनरावलोकन आवश्यक.
(सदर कर्ज सुविधा, कोणतेही कारण न देता बंद करण्याचा अधिकार बँक अबाधित ठेवत आहे).
तारण खरेदी करण्यात येणाऱ्या मालमत्तेचे नोंदणीकृत अथवा साधे गहाणखत.
तारण मालमत्तेची मालकी कर्जदाराव्यतिरिक्त इतर व्यक्तीची असल्यास सदर व्यक्तीस सहकर्जदार अथवा जमीनदार म्हणून राहावे लागेल.

सूचना: १. तारण मालमत्ता व्यावसायिक किंवा निवासी असावी.
२. सदर मालमत्ता स्वतःच्या वापरातील अथवा भाडेपट्ट्यानी दिलेली असू शकेल.
३. कृषी जमीन तारण म्हणून स्वीकारण्यात येणार नाही.
४. तारण मालमत्ता ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातअसल्यास सक्षम प्राधिकरणाकडून अधिकृत परवानगी प्राप्त असावी.
जामीनदार कर्ज रकमेस जामीन राहण्यास योग्य उत्पन्न स्त्रोत व पद असलेले तसेच बँकेस मान्य होणारे दोन जमीनदार.
Collaterals आवश्यक नाही.
प्रक्रिया शुल्क Upto Rs.25 lacs :0.40% Above Rs.25 lacs :0.75%
Subscription of Bank's Share 2.50%
Pre-payment Charges लागू नाही.

अटी व शर्ती लागू
जादा माहितीसाठी नजीकच्या शाखेशी संपर्क करावा.


Follow Us

        संपर्क करा :    मुख्य कार्यालय     0251-2316641, 0251-2315995 0251-2220700  |   ए.टी.एम. संबंधी     0251-2219008  |   टोल फ्री     18002331919 (सकाळी ९ ते सायंकाळी ६, कामकाजाच्या दिवशी )  |     response@kalyanjanata.in