शैक्षणिक कर्ज


उद्देश मान्यता प्राप्त शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या खर्चाकरिता कर्ज.
यामध्ये शिक्षण शुल्क, त्यासाठी लागणारी पुस्तके, इतर साहित्याचा खर्च तसेच वसतीगृह शुल्क व त्यासंबंधीचे खर्च यांचा समावेश राहील. शिक्षणक्रम परदेशी विद्यापीठामधील असल्यास तेथे जाण्याकरीताचा प्रवास खर्चाचाही त्यामध्ये समावेश करता येईल.
पात्रता विद्यार्थी व पालक संयुक्त कर्जदार राहतील.
इतर बाबी:
१] विद्यार्थ्याने आधीच्या सर्व परीक्षा पहिल्या प्रयत्नातच उत्तीर्ण असणे अनिवार्य.
२] ज्या शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी कर्ज मागणी केली आहे, त्याकरीता संबंधित विद्यापीठाकडून प्रवेशनिश्चिती आवश्यक आहे.
३] कर्जास पत्र असलेले अभ्यासक्रम – पदवी / पदव्युत्तर परीक्षा / वैद्यकीय अभ्यासक्रम / पशुवैद्यकीय अभ्यासक्रम इ. / अभियांत्रिकी / सागरी अभियांत्रिकी / वास्तुविशारद / शेतकी / व्यवस्थापन / कायदा इ. / वैमानिक / एअर होस्टेस / आय ए टी ए अभ्यासक्रम / आदरातिथ्य संबंधी अभ्यासक्रम / नामांकित परदेशी विद्यापीठ / संस्थेचे अभ्यासक्रम
४] नामांकित खाजगी प्रशिक्षण वर्ग (कर्ज मर्यादा ₹ २ लाखांपर्यंत )
कर्ज रक्कम १. विना तारण:
₹ ५ लाखांपर्यंत (पालकांच्या पगारासंबंधी हमी पत्र / सेक्शन ४९ / पगार खात्यातून ईसीएस उपलब्ध असल्यास)
२. तारणासहीत:
i) देशांतर्गत शिक्षणासाठी : ₹ १० लाखांपर्यंत
ii) परदेशी शिक्षणासाठी : ₹ २० लाखांपर्यंत .
मार्जिन एकूण शैक्षणिक खर्चाच्या @ ५ %
परतफेडीचा कालावधी १. कर्ज रक्कम ₹ २ लाखांपर्यंत : ५ वर्षे अथवा पालकांच्या सेवेचा उर्वरित कालावधी यांपैकी
कमी असणारा कालावधी. कर्ज परतफेडीचा हप्ता कर्ज वितरणापासून एक महिन्यानंतर सुरु होईल
कर्ज रक्कम ₹ २ लाखांपेक्षा जास्त असल्यास , कर्जदार खालील क्रमांक २ व ३ पर्यायांपैकी कोणताही एक पर्याय निवडू शकेल.
२. कमाल कालावधी ५ वर्षे . कर्ज परतफेडीचा हप्ता कर्ज वितरणापासून एक महिन्यानंतर सुरु होईल
३. कमाल कालावधी ५ वर्षे . कर्ज परतफेडीचा हप्ता शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण झाल्यापासून ६ महिन्यांनी अथवा कर्जदार विद्यार्थ्यास नोकरी मिळाल्यानंतर यांपैकी आधी येणाऱ्या तारखेस चालू होईल. तसेच परतफेडीचा हप्ता सुरु करण्याची तारीख ठरवताना पालकांचे वय आणि उर्वरित सेवेचा कालावधी / व्यवसायाचे स्वरूप विचारात घेण्यात येईल.

कर्ज परतफेड चालू होण्यापूर्वीच्या कालावधीचे व्याज दरमहा भरणे अनिवार्य राहील.
तारण ₹ २ लाखांपर्यंत (२ जमीनदार)
₹ २ ते ५ लाखांपर्यंत- कर्जदाराच्या नावे कर्ज रकमेइतकी जीवन विमा पोलिसी घ्यावी लागेल.
₹ ५ लाखांच्यावर – कमीतकमी कर्ज रकमे इतक्या बाजार मूल्याची स्तःव्र मालमत्ता किंवा अन्य आर्थिक गुंतवणुकी उदा. मुदत ठेव , राष्ट्रीय बचत पत्र , पुरेसे सरेंडर मूल्य असलेली विमा पोलिसी
जामीनदार कर्ज रकमेस जामीन राहण्यास योग्य उत्पन्न स्त्रोत व पद असलेले तसेच बँकेस मान्य होणारे २ जमीनदार.
Collaterals आवश्यक नाही.
प्रक्रिया शुल्क कर्ज मंजूर रकमेच्या ०.७५ % + सेवा कर.
Subscription of Bank's Share Sec Loan 2.5% ,Unsec. Loans 5%
Pre-payment Charges लागू नाही.

अटी व शर्ती लागू
जादा माहितीसाठी नजीकच्या शाखेशी संपर्क करावा.


Follow Us

        संपर्क करा :    मुख्य कार्यालय     0251-2316641, 0251-2315995 0251-2220700  |   ए.टी.एम. संबंधी     0251-2219008  |   टोल फ्री     18002331919 (सकाळी ९ ते सायंकाळी ६, कामकाजाच्या दिवशी )  |     response@kalyanjanata.in