बँकेची वाटचाल :

गेल्या ४ दशकांहून अधिक काळ दि कल्याण जनता सहकारी बँक लि., कल्याण व नजीकच्या परिसरातील ग्राहकांना समर्पित सेवा देत आहे. दिसेम्बेर १९७३ मध्ये अत्यंत लहान प्रमाणात सुरुवात करून या ४० वर्षांच्या कालावधीमध्ये बँकेने नेत्रदीपक प्रगती करून रु. ४५४८ कोटींहून अधिक एकत्रित व्यवसायापर्यंत वाटचाल केलेली आहे. सुमारे ५५००० चे वर भागधारक व ४००००० चे वर ग्राहकांना सेवा देताना बँक सातत्याने ग्राहक सेवेचा स्तर उंचावत असून खर्या अर्थाने ‘जनता बँक’ झालेली आहे.

सन १९७० मध्ये अॅड. भाऊराव सबनीस आणि श्री. वसंतराव पुरोहित यांनी पुढाकार घेऊन अतांत प्रतिकूल परिस्थितीमध्ये कल्याणमधील मध्यम व निम्नवर्गीय ग्राहकांसाठी बँकेची स्थापना केली. त्याच सुमारास डी कल्याण पीपल्स को-ऑप. बँक लि. अवसायानात निघाली होती व त्यामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात सहकारी बँकांविषयी असंतोष होता. या पार्श्वभूमीवर बंकेकरीता भागभांडवल उभारणे हे एक नाऊमेद करणारे काम होते. अढळ निर्धार व अथक परिश्रमांद्वारे ३ कर्मचारी , रु. ५०,०००/- चे भांडवल आणि रु. ५०,०००/- च्या ठेवींच्या आधारे १८० चौरसफुटाचे जागेत बँकेचे कामकाज ळांप्रमानात सुरु झाले.

श्री. बी. पी. जोशी , डॉ. पी. व्ही. कारखानीस , अॅड. भाऊराव सबनीस , श्री. व्ही. जी. फडके – सनदी लेखापाल, प्रा. ए.पी. प्रधान, श्री. एस. एम. ओक, श्री. य. ए. शेख, श्री. एन. डी. भोईर, श्री. जी.एस. करम, श्री. व्ही. एच. पुरोहित, श्री. डब्ल्यू. डी. साठे इ. मान्यवर बँकेचे पहिले ‘बोर्ड ऑफ डायरेक्टर्स होते. संस्थापकांचा उत्साह व त्यांचा द्रष्टेपणा यांचे आधारे बँकेने महाराष्ट्र राज्यातील एक महत्वाच्या सहकारी बँकेचे स्थान मिळवून ३८ शाखांचेद्वारे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर व नाशिक येथे आपल्या व्यवसायांचा प्रसार केलेला आहे.

महत्वाचे टप्पे :

 1. २६ जानेवारी १९८७ रोजी ‘गायन समाज’ इमारतीत स्थलांतर.
 2. १९९२ मध्ये बँकेची स्वतःची ३ माजली इमारत
 3. त्याच वर्षात्त बँकेचे मुख्य कार्यालय कल्याण रेल्वे स्थानकाजवळील विस्तीर्ण जागेत स्थलांतरित केले.
 4. १९९४ चे अखेरीस बँकेच्या एकूण ठेवी रु. ५० कोटी झाल्या
 5. वर्ष १९९६-९७ अखेर बँकेने ठेवींचा रु. १०० कोटींचा टप्पा गाठला.
 6. सन १९९८ मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकेला ठाणे जील्यातून रायगड व मुंबई या जिल्ह्यांमध्ये विस्तार करण्यास परवानगी दिली.
 7. बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मुंबई संशोधन केंद्राची स्वतंत्र सदस्यता 0१/0१/१९९९ पासून मिळाली.
 8. बँकेस जानेवारी २००० मध्ये ‘शेड्युल्ड बँक’ दर्जा प्राप्त झाला.
 9. मे २००४ मध्ये बँकेने मुंबईमध्ये घाटकोपर येथे शाखा कार्यान्वित केली.
 10. आर्थिक वर्ष २००७-०८ मध्ये बँकेने रु. ५०० कोटींच्या ठेवी पूर्ण केल्या.
 11. ७ फेब्रुवारी २००९ रोजी सज्जनगड सातारा येथे बँकेने डी. सातारा मर्चंट्स को. ऑप. बँकेबरोबर विलीनीकरणाचा मान्यता करार केला.
 12. मार्च २००९ मध्ये बँकेने एकत्रित व्यवसायाचा रु. १००० कोटींचा टप्पा पार केला.
 13. सप्टेंबर २०१२ मध्ये बँकेचा एकत्रित व्यवसाय रु. २००० कोटींवर गेला.
 14. बँकेच्या ३९ शाखांमधून अनिवासी भारतीयांची खाती उघडण्याची सोय उपलब्ध आहे.
 15. सप्टेंबर २०१६ मध्ये बँकेचा एकत्रित व्यवसाय रु. ४००० कोटींवर गेला.

रौप्य महोत्सवी वर्ष

बँकेने रौप्य महोत्सवी वर्षात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आणि अनेक सामाजिक संस्थाना मदत केली. हे वर्ष बँकेस एक संस्मरणीय कालखंड आहे. वर्षाची सुरवात श्री. रामभाऊ ताम्हाणे यांना त्यांचे वनवासी लोकांकरीताच्या कल्याणकारी कार्याबद्दल कै. प्रमोद महाजन यांचे हस्ते ‘संचालक पुरस्कार’ देऊन करण्यात आली. रौप्य महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ, मध्य प्रदेश राज्याचे राज्यपाल मा. श्री. भाई महावीर यांचे उपस्थितीमध्ये संपन्न झाला. त्यांचे हस्ते कै. श्री सुरेंद्र वाजपेयी यांना त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील संस्मरणीय कार्यकर्ता ‘संचालक पुरस्कार’ देण्यात आला. या वर्षातील बँकेने केलेल्या काही उपक्रमाबद्दल थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे :

संगीत महोत्सव :

ओक बाग, कल्याण येथील मैदानावर ३ दिवस संगीत महोत्सव साजरा झाला. पहिल्या दिवशी प्रख्यात बासरी वादक श्री. हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरी वादनाणे वातावरण बहरून गेले. डॉ. सौ. मीना नेरुरकर यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकास्थित कलाकारांनी संगीत नाटक ‘वसुंधरा’ सदर केले. तिसर्या दिवशी श्री. अनिल मोहिले व त्यांच्या सहकारी वाद्यवृदांनी २००० चे वर प्रेक्षकांना मोहित केले. हा एक संस्मरणीय अनुभव होता.

सहकार दिंडी

बँकेच्या कर्मचार्यांनी सिंदिकेत शाखा ते मुख्य शाखेपर्यंत कल्याणमधील मुख्य मार्गांवरून शोभायात्रा काढली. त्याची सांगता बँकेच्या सुरवातीचे शाखास्थापनापासून टिळक पुतळ्यापर्यंत सहकार ज्योत नेऊन करण्यात आली.

संचालकांकारिता कार्यशाळा

कोकण नागरी सहकारी बँकेस असोसिएशनचे संचालक व सभासदांसाठी एक दिवसाची कार्यशाळा , महावीर सभागृह, कल्याण येथे आयोजित केली होती. या कार्यक्रमास भरगोस प्रतिसाद लाभला .

भजन स्पर्धा

सुमारे ४० पेक्षा जास्त भजनी मंडळांनी या उपक्रमात भाग घेतला. हा एक बहुभाषिक कार्यक्रम ठरला.

भारतीय स्वातंत्र्याचे सुवर्ण महोत्सवी वर्ष :

१४ ऑगस्ट चे संध्याकाळी केवळ २ तासांमध्ये ८ शाखांद्वारे राबविण्यात आलेल्या ठेव संकलन अभिनयाद्वारे बँकेने रु. १.२५ कोटींच्या ठेवी संकलित केल्या. त्या दिवशी रात्री २ वाजता (१५ ऑगस्टचे प्रारंभी ) स्वातंत्र्य सैनिकांचे तस्ते करण्यात आलेल्या झेन्दावंदन कार्यक्रमास कल्याणमधील नागरिकांचा भरगोस प्रतिसाद लाभला.

तंत्रज्ञानाद्वारे प्रगती:

३१.०३.२०१६ अखेर बँकेच्या ३८ शाखांद्वारे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये विस्तार झालेला आहे. बँकेच्या सर्व शाखा CBS प्रणालीद्वारे जोडलेल्या असून सर्व शाखांकडे ATM उपलब्ध आहेत.

बँक NDS प्रणालीची स्वतंत्र सभासद आहे. NDS (निगोशीएटेड डीलिंग सिस्टम) या प्रणालीद्वारे सरकारी कर्जरोख्यांचे दैनंदिन व्यवहार करता येतात. NEFT/RTGS द्वारे भारतातील कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेत आमचे ग्राहक पाठवू शकतात. या प्रणालीद्वारे रक्कम वर्ग करणेची सर्व प्रक्रिया बँकेच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे. बँकेने इंटरनेट बँकिंग व मोबाईल बँकिंग (IMPS) ग्राहकांकरिता उपलब्ध करून दिलेले आहे.

बँकेच्या ३९ शाखांमधून अनिवासी भारतीयांकडून भारतीय रुपयांमध्ये ठेव स्वीकारण्याकरीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अधिकृत सहकारी बँक म्हणून मान्यता दिलेली आहे. महाराष्ट्र राज्य सरकार कडून बँकेला STAMP VENDING LICENSE देण्यात आलेले असून, सदर सेवा FRANKING MACHINE द्वारे ‘काळातलाव शाखा’, कल्याण येथे कार्यान्वित आहे.

व्यावसायिक वचनबद्धता / धोरणे :

आपली बँक इतर कमर्शियल बँकांपेक्षा, काहीसा अधिक असा आकर्षक व्याजदर आपल्या ग्राहकांना देत असते. शिवाय नोंदणीकृत गृहनिर्माण सहकारी संस्था व वरिष्ठ नागरिकांना @.०५० % व 0.७५ % अनुक्रमे अधिक व्याजदर देण्यात येतो. bank आपल्या ग्राहकांना त्यांच्या ग्र्जाक्रिता सुयोग्य अशा अनेक कर्जसुविधा देत आहे. त्यात प्रामुख्याने वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज. वाहन कर्ज, पर्यटन कर्ज, शैक्षणिक कर्ज , विविध प्रकारे व्यवसायासाठी कर्ज यांचा समावेश असून कर्जफेडीचा कालावधी हा ग्राहकास सुलभ राहील याची काळजी घेतली जाते. बँकेने सुमारे १२००० पेक्षा जास्त व्यक्ती / व्यावसायिक यांना कर्जयोजनांद्वारे निधी उपलब्ध करून त्यांना नवनवीन व्यवसाय / उपक्रम सुरु करण्यात अडत केली असून संबंधित व्यक्ती / कुटुंबाचे राहणीमान उंचावण्यात हातभार लावलेला आहे.

सामाजिक व नैतिक बांधिलकी :

संचालकांनी बँकेकडून कर्ज घेऊ नयेत असे अधेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नजीकचे काळात काढले आहेत. परंतु आपल्या बँकेने त्यापूर्वी संचालकांनी बँकेकडून कर्ज ण घेण्याचे धोरण बँक स्थापनेपासून खंबीरपणे राबविले आहे.

संचालकांना देय असलेल्या सभाशुल्कापोटीची रक्कम ही ‘संचालक समाजसेवा पुरस्कार निधी’ या न्यासाकडे वर्ग करण्यात येते. या जमा रकमेमधून रु. २५०००/- ची रक्कम प्रत्येकी ,विविध क्षेत्रांतील यश प्राप्त करणाऱ्या तसेच ठाणे जिल्ह्यांमधील मान्यवर व्यक्तींना पुरस्कार स्वरुपात देण्यात येते. आजवर हा पुरस्कार देण्यात आलेल्या काही मान्यवर व्यक्तींची नवे पुढील प्रमाणे :
श्री. नानासाहेब करंदीकर, श्री. भगवानराव जोशी, श्री. वि. आ. बुवा, श्री. सुरेंद्र वाजपेयी, श्री. रामभाऊ कापसे, श्री. दत्तात्रय म्हैसकर, श्री. जयकुमार पाठारे, श्री. वामनराव प्रभुदेसाई.

बँक सामाजिक बांधिलकीसाठी कायम सजग आहे. गेल्या ४ दशकांहून अधिक काळ विविध, सामाजिक, शैक्षणिक , सांस्कृतिक, वैद्यकीय आणि क्रीडा क्षेत्रातील संस्थाना बँकेने आधार दिलेला आहे. आजवर बँकेने गेल्या ४ दशकांहून अधिक कालावधीमध्ये विविध धर्मदाय संस्थाना रु. ५० लाखांहून अधिक आर्थिक मदत केलेली आहे. कै. रामभाऊ म्हाळणी सभागृह (कल्याण), जनता बँक ऑडीटोरीयम, महिला उद्योग मंदिर आणि कै. दामूअण्णा टोकेकर, आदिवासी वसतिगृह (अंभाण, तालुका – पालघर) या संस्था सुरु करणेसाठी बँकेने आर्थिक मदत केलेली आहे. विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये विषेश प्राविण्य मिळविणाऱ्या सभासदांच्या पाल्यांना ‘सभासद कल्याण निधीतून’ रोख पुरस्कार ’विद्यार्थी प्राविण्य पुरस्कार’ या नावे दिले जातात. महिला व वर्षांवरील सभासदांना मोफत वैद्यकीय परीक्षण व वैद्यकीय उपचारांकरिता आर्थिक मदत करण्यात येते. ‘कर्मचारी कल्याण निधी द्वारे कर्मचारी कल्याणाकरिता विवध कार्यक्रम राबविण्यात येतात. या अंतर्गत वार्षिक स्नेहसंमेलन, करमणुकीचे कार्यक्रम, सहली, क्रीदास्पर्षा इत्यादींचे आयोजन केले जाते. सर्व कार्य्क्रम्माना बँकेचे कर्मचारी उत्साहाने सहभागी होतात.

सारांश

अंतर्मत: असा निष्कर्ष काढता येईल कि, बँकेची प्रगती ही सांघिक प्रयत्न आणि बँक हे एक कुटुंब वा परिवार असण्याची भावना याचे आधारे होत आहे. सहक्र्याची वृत्ती व आपुलकी असणाऱ्या आमच्या ग्राहकांना सेवा देणाऱ्या आमच्या कार्यक्षम व प्रवीण कर्मचाऱ्यांना आमचे उत्साही आणि दूरदृष्टी असणारे संचालक नेहमी मार्गदर्शन करीत असतात.

Follow Us

        संपर्क करा :    मुख्य कार्यालय     0251-2316641, 0251-2315995 0251-2220700  |   ए.टी.एम. संबंधी     0251-2219008  |   टोल फ्री     18002331919 (सकाळी ९ ते सायंकाळी ६, कामकाजाच्या दिवशी )  |     response@kalyanjanata.in